
तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो
तळोदा येथील स्वयम दिनेश सराफ या अकरा वर्षांच्या बालकाने संस्कृत श्लोक मुखोद्गत केल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नावाची निवड झाली आहे.
तळोदा येथील इंग्लिश मिडीयम मध्ये इयत्ता चौथी मध्ये शिकणारा अवघ्या अकरा वर्षाच्या स्वयंम याने BAPS स्वामीनारायण संस्थेच्या ‘सत्संग दीक्षा श्लोकचे पाठांतर’ कार्यक्रमात सहभागी होऊन संस्कृत मध्ये ३१५ श्लोक तोंडी मुखपाठ करून म्हणून दाखवले, त्याचा या कर्तृत्वाने तळोदा शहराचे व परिसराचे नावलौकिक वाढवला. तो दिनेश गजानन सराफ यांचा मुलगा आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव सिलेक्शन झाले आहे. त्याबद्दल त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून प्रमाणपत्र मिळाले आहे. त्याच्या श्री स्वामीनारायण संस्था बडोदा येथे सत्कार करण्यात आला. येथील सुवर्णकार समाजा तर्फे या यशाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
- 0
- 0
- 0
- 0





