नंदुरबार

धवळी विहीर व अमोनी येथे पशुसंवर्धन विभागातर्फे वंधत्व निवारण व आरोग्य शिबिरे संपन्न

धवळी विहीर व अमोनी येथे पशुसंवर्धन विभागातर्फे वंधत्व निवारण व आरोग्य शिबिरे संपन्न

नंदुरबार | सप्त नगरी न्युज ब्युरो

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत पशुधनाच्या आरोग्य संवर्धनासाठी विविध ठिकाणी वंधत्व निवारण, गर्भधारणा तपासणी, जंतनिर्मूलन व लसीकरण शिबिरे यशस्वीरीत्या राबविण्यात आली.

दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मौजे धवळी विहीर, ता. तळोदा येथे आयोजित शिबिरात वंधत्व निवारण, गर्भधारणा तपासणी, जंतनिर्मूलन तसेच FMD (Foot and Mouth Disease) लसीकरण करण्यात आले. या शिबिरात एकूण २४० जनावरांचे लसीकरण व जंतनिर्मूलन करण्यात आले.

या उपक्रमास डॉ. अरुण महाकाळ, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, तळोदा, डॉ. अजय मोळके, पशुवैद्यकीय अधिकारी, बोरद तसेच श्री. राजेश पावरा, श्री. नितीन मगरे, श्री. प्रताप पावरा, दुर्गेश व श्री. भरत पावरा यांचे सहकार्य लाभले.

तसेच दि. ३१ जानेवारी २०२६ (शनिवार) रोजी पशुचिकित्सालय, अमोनी (स्थानिक अंतर्गत), ता. तळोदा – ‘रेवा नगर’ (पुनर्वसित) येथे वंधत्व निवारण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण २७० जनावरे दाखल झाली. बैल, गाय, म्हैस, वासरे, शेळ्या व कोंबड्या अशा सर्व जनावरांना जंतनाशक औषधे देण्यात आली.

पक्ष्यांसाठी (कोंबड्या) Antibiotic व Deworming पावडर वितरित करण्यात आली. शिबिरादरम्यान ३ गायी व ४ म्हशींना कृत्रिम रेतन करण्यात आले. तसेच १६ म्हशी व ४ गायींची वंधत्व तपासणी करण्यात आली. एकूण ८३ जनावरांवर औषधोपचार करण्यात आले.

या शिबिरास डॉ. तुषार गिते, सहाय्यक आयुक्त, नंदुरबार, डॉ. अरुण महाकाळ, सहाय्यक आयुक्त, तळोदा, डॉ. गौतम तोटकवार, पशुवैद्यकीय अधिकारी, अमोनी यांच्यासह सदाभाऊ ठाकरे, तांबोळी, राजेश पावरा, सागर पावरा, श्री. प्रताप पावरा, अनेश वसावे, मगन पावरा आदींनी सहकार्य केले.

या शिबिरांमुळे पशुधनाचे आरोग्य सुधारण्यास, उत्पादनक्षमता वाढविण्यास तसेच शेतकरी व पशुपालकांना थेट लाभ मिळण्यास मोठी मदत झाली आहे.

(Collector Office Nandurbar)

FMDvaccination #AnimalHealth #DairyDevelopment

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *