नंदुरबार

सिरियल किलर नाटकाच्या समारोपप्रसंगी भाऊ कदम यांचा नेमसुशिल परिवाराकडून गौरव.

सिरियल किलर नाटकाच्या समारोपप्रसंगी भाऊ कदम यांचा नेमसुशिल परिवाराकडून गौरव.

  नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-     नंदुरबार छत्रपती शिवाजी येथील महाराज नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या गाजलेल्या ‘सिरियल किलर’ या नाटकाच्या समारोपप्रसंगी महाराष्ट्राचे लोकप्रिय हास्यसम्राट “भाऊ कदम” यांचा नेमसुशिल परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आलायावेळी नेमसुशिल समूहाच्या वतीने मुख्याध्यापिका पुष्पा बागुल यांनी भाऊ कदम यांना ‘नेमसुशिल’ पुस्तिका भेट देऊन त्यांचा गौरव केला. या प्रसंगी नंदुरबार मोती बँक शाखेचे व्यवस्थापक नितीनभाई वाणी, प्राचार्य सुनिल परदेशी, रुपलबेन वाणी तसेच शिक्षक अरुण कुवर उपस्थित होते. सन्मानाला उत्तर देताना भाऊ कदम यांनी नेमसुशिल समूहाचे अध्यक्ष निखिलभाई तुरखिया ,मोती बँकेचे अध्यक्ष हर्षिल तूरखिया तसेच संपूर्ण नेमसुशिल परिवाराचे मनःपूर्वक आभार मानले. समाजाभिमुख व शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेमसुशिल परिवार करत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमात उपस्थितांनी भाऊ कदम यांच्याशी संवाद साधत छायाचित्रे काढली. उत्स्फूर्त वातावरणात पार पडलेल्या या समारोप सोहळ्याने उपस्थित प्रेक्षकांच्या मनावर आनंददायी छाप पाडली.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *