नंदुरबार

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वितरण; दिव्यांग सेवा केंद्रासाठी प्रयत्न- आ. रघुवंशी

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वितरण;

दिव्यांग सेवा केंद्रासाठी प्रयत्न- आ. रघुवंशी

 

← Back

Thank you for your response. ✨

← Back

Thank you for your response. ✨

नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-      दिव्यांग बांधवांना स्वावलंबी जीवन जगता यावे आणि त्यांच्या दैनंदिन प्रवासात सुलभता यावी, या उद्देशाने एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरातील ८८ पात्र लाभार्थ्यांना सुमारे ५० लाख रुपये किमतीच्या ई-सायकलींचे वितरण रविवारी शिवसेनेचे नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

शहरातील यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेसच्या सीएसआर निधीतून, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलीमको) व आ. चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४९ ते ७९ टक्के अस्थिव्यंग असलेल्या ८८ दिव्यांग लाभार्थ्यांना ई-सायकलींचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की, नंदुरबार शहरात दिव्यांग सेवा केंद्रास मंजुरी मिळाल्यानंतर जयप्रकाश नारायण रुग्णालय परिसरात नगरपालिकेच्या माध्यमातून स्वतंत्र कार्यालय उभारण्यात येईल. त्यामुळे पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष केंद्रात जाऊन तातडीने आवश्यक साहित्य उपलब्ध होईल. यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमदार निधीतून जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ३० लाख रुपयांच्या सायकलींचे वाटप करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगमचे डॉ. किरण पावरा यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी, गटविकास अधिकारी वाघमारे, एलीमकोचे प्रबंधक कमलेश यादव, शेतकी संघाचे अध्यक्ष बी. के. पाटील, बाजार समितीचे सभापती ठाणसिंग राजपूत, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक कुणाल वसावे, दीपक दिघे, रवींद्र पवार, परवेज खान, भरत चौधरी, नगरसेविका सोनिया राजपूत, पप्पू गिरासे,चेतन वळवी,मोहितसिंग राजपूत, जितेंद्र मराठे,जय रघुवंशी,आकाश अहिरे, प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. माधव कदम यांनी केले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *