तळोदा नेमसुशील राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत अर्णव चित्ते चे यश

तळोदा | सप्त नगरी न्युज ब्युरो
तळोदा शहरातील नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थी अर्णव महेश चित्ते ह्या विद्यार्थ्यांचा 22 व्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनय सादरीकरण बद्दल निवड करण्यात आली. नंदुरबार येथे पार पडलेल्या बालनाट्य स्पर्धेत नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी बदलू आम्ही गोष्टीला या नाटकाचे सादरीकरण केले त्यात उत्कृष्ट अभिनयाने अर्णव चित्ते याची निवड करण्यात आली.

राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत यश संपादन बद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखीया, संचालिका सोनाभाभी तुरखीया, उपाध्यक्ष डी एम महाले, सचिव संजय पटेल, संस्था समनव्यक हर्षिलभाई तुरखीया, मुख्या.श्रीमती पुष्पा बागुल, नाट्य दिग्दर्शक अरुण कुवर,
प्रकाश योजना तंत्रज्ञ सुनील परदेशी, संगीत तंत्रज्ञ सचिन पाटील, रंगभूषा तंत्रज्ञ कल्याणी वडाळकर, वेषभूषा तंत्रज्ञ सागर मराठे, रंगमंच व्यवस्थापक रवींद्र गुरव, नृत्य दिग्दर्शक अश्विनी भोपे आदींनी नाट्य तंत्रज्ञ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले.
- 0
- 0
- 0
- 0





