नवागाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

तळोदा तालुक्यातील नवागाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत थोर समाजसुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळीविद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका विजयालक्ष्मी पाडवी, वनश्री पावरा, स्मिता तडवी तसेच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक अभय सराफ यांनी विद्यार्थ्यांना बालिका दिनाचे महत्त्व समजावून सांगत मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी विद्या ठाकरे, विद्यार्थी गौरव वर्ती, शुभांगी ठाकरे, सेजल ठाकरे, मयुरी पाडवी तसेच इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी वृषाली ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयालक्ष्मी पाडवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील पावरा यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
- 0
- 0
- 0
- 0





