नंदुरबार

खामगांव ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

खामगांव ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

नंदुरबार | ७ ऑगस्ट

बिलाडी धरणामुळे पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर खामगांव गावाच्या पुनर्वसनासंदर्भातील विविध मागण्या तसेच देहली मध्यम प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीस आमदार आमश्या फुलजी पाडवी, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सुधारित आराखड्यानुसार खामगांव गावाला सध्या जलाशयामुळे कोणताही तात्काळ धोका नसल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले. तसेच विद्यमान नियमांनुसार पुनर्वसनाची आवश्यकता लागू होत नसल्याची माहिती देण्यात आली.

खामगांव ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर स्वतंत्र बैठक आयोजित करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मा. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पुढील बैठकीस गावातील सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *