
नेमसुशिल विद्यामंदिरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नेमसुशिल व श्रीमोती विद्यामंदिरात प्रमुख मार्गदर्शक डॉ दिपक शेंडे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संशोधक सी. व्ही. रमण यांचा शोध ‘ रमण इफेक्ट’ विषयी माहिती सांगितली. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा उद्देश लक्षात घेऊन विज्ञानाचा उपयोग आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत करतो. विज्ञानातील प्रत्येक संकल्पनेशी आपण कसे जुळलेलो आहोत, आणि त्यातून आपली समृद्धी कशी करून घेत असतो अशा स्वरूपाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुनील परदेशी सर, श्रीमोती विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती डोंगरे मॅडम, वरिष्ठ विज्ञान शिक्षक सचिन पंचभाई, वरिष्ठ शिक्षिका श्रीमती माधुरी पाटील मॅडम, विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक श्री. रविंद्र गुरव यांनी केले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री निखिल भाई तुरखिया, उपाध्यक्ष महाले आप्पा, सचिव संजय पटेल, संचालिका सोनाभाभी तुरखिया, संस्था समन्वयक हर्षिल तुरखिया यांनी कार्यक्रमाचे कौतुकास्पद अभिनंदन केले.
- 1
- 0
- 0
- 0





