नंदुरबार

वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अक्षय ऊर्जा दिन उत्साहात साजरा 

वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अक्षय ऊर्जा दिन उत्साहात साजरा 


शहादा सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नुकताच अक्षय ऊर्जा दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यालयात पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत इयत्ता नववी आणि दहावी च्या एकूण 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. एम. पाटील यांनी केले या कार्यक्रमाला उपप्राचार्य जे. बी. पवार, उपमुख्याध्यापक बोरसे एस.आर., पर्यवेक्षक खान ए. ए. उपस्थित होते
खान सरांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली. वरील स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यापैकी उत्कृष्ट तीन पोस्टर निवडण्यात आलेत वरील कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन वाल्हे एच.ए. यांनी तर आभार गिरासे जी.एल. यांनी मानले. विद्यार्थ्यांना पोस्टर बनवण्यासाठी विज्ञान शिक्षक गिरासे जी. एल. व वाल्हे एच. ए. याचे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *