
नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयातील महिला रुग्णालय व मेंदु आरोग्य रुग्णालयांस मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल (भाप्रसे) यांची भेट;
आरोग्य सेवांचा घेतला आढावा.

नंदुरबार: सप्त नगरी न्यूज ब्युरो:- जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या महिला रुग्णालय आणि मेंदू आरोग्य रुग्णालय (Brain Health Clinic) येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल (भाप्रसे) यांनी काल (दि. १९ ऑगस्ट २०२६) प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी करत यंत्रणे मार्फत देण्यात येणा-या आरोग्य सेवांचा आढावा घेतला.

भेटीची प्रमुख वैशिष्ट्ये व घेतलेला आढावा:
• योजनांची अंमलबजावणी: भेटीदरम्यान त्यांनी ‘आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना’ या एकत्रित मदत केंद्राची पाहणी केली आणि योजनेच्या लाभाबाबत माहिती घेतली.

• रुग्णांची आस्थेवाईक चौकशी: महिला रुग्णालयात दाखल असलेल्या माता आणि बालकांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यांना मिळणाऱ्या उपचार व सुविधांची माहिती घेतली.

• मार्गदर्शक सूचना: रुग्णालयामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना आणखी उत्तम आणि दर्जेदार आरोग्य सेवा कशा प्रकारे देता येतील, याविषयी उपस्थित वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना दिल्या.
- 0
- 0
- 0
- 0





