एस.ए.एम. इंग्लिश मिडीयम स्कूलवार्षिक पारिताेषिक व महिला दिवस साजरा

तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो
तळाेदा येथील एस.ए.एम. इंग्लिश मिडीयम स्कूल येथे मंगळवार रोजी शालेय व सहशालेय विविध उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते देऊन गाैरविण्यात आले.

बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तळाेदयातील सिव्हिल इंजिनिअर अविनाश पिंपरे व प्रमुख अतिथी अमोल गुजराथी हे मान्यवर उपस्थित हाेते.
यावेळी इयक्ता दहावीचा विद्यार्थी व हेड बॉय ऑफस्कूल प्रीत देवेंद्र सोनगढवाला व हेड गर्ल नुपूर मुकेश वाणी तसेच ब्लू हाँऊस कॅप्टन आयुष अरुण महाजन व तनुश्री किरण सूर्यवंशी, ग्रीन हाँऊस चे कॅप्टन नैतिक उदय सूर्यवंशी व गुंजन योगेश मराठे, रेड हाँऊस चे देवांग शैलेंद्र सागर व यज्ञा दिपक सूर्यवंशी तसेच येलाे हाँऊस कप्टन चिराग चंद्रशेखर सूर्यवंशी व तेजल अमृत महाले या विद्यार्थ्यांनी वर्षभर आपापल्या हाँऊस चे कार्य वर्षभर यशस्वीरित्या सांभाळल्याबद्दल त्यांच्या गौरव करण्यात आला.
तसेच बेस्ट बॉय चे बक्षीस प्रीत देवेंद्र सोनगडवाला बेस्ट गर्ल म्हणून तेजल अमृत महाले, बेस्ट स्पोर्ट्स पर्सन तपस भौमिक चेतन यास तर गोल्डन गर्ल मुलींमध्ये नाईक साक्षी प्रशांत यांना उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देण्यात आला.

स्कॉलर ऑफ द इयर 2025 -2026 राठोड साक्षी संजय हेल्पिंग हॅण्ड चा पुरस्कार पाटील चेतन पोपट व 100% अटेंडन्स चा पुरस्कार प्रीत देवेंद्र सोनगडवाला व वसावे नंदिनी अनुपम या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला . मुख्याध्यापक श्री. सत्यजित नाईक सरांनी विद्यार्थी सुजनशिल व कर्तुत्ववान असावा व आपल्या ला मिळालेल्या प्रत्येक संधीच्या उपयोग करून जीवनातील विविध भागात आज आपल्या कर्तुत्वाने मानाने उभे राहून आपल्या पालकांचं व शाळेचे नाव उज्वल करावे ही अपेक्षा व्यक्त केली. तर प्रमुख अतिथी अमोल गुजराथी यांनी विद्यार्थाचे कौतुक करताना म्हटले की यशस्वी होण्यासाठी सातत्य व प्रमाणिक प्रयत्न करत रहावे व शालेय जीवनात मिळालेलं नेतृत्व गुण विकसित करावे.
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता पाडवी तर बक्षिस वितरणाचे महत्व निळकंठ सूर्यवंशी यांनी विशद केले तर आभार प्रदर्शन .विकास वडिले यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
- 0
- 0
- 0
- 0





