
तळोदा, ता. ९ सप्त नगरी न्युज ब्युरो
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे ५३ वे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी (ता. १) फेब्रुवारी रोजी लोकमान्य बाळ गंगाधर चेंबूर, मुंबई येथे होणार आहे. या अधिवेशनाला नाशिक विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक विभागीय कार्यवाह डी. पी. महाले यांनी केले.
महामंडळाच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये शिक्षकेतर बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर विचारविनिमय, चर्चासत्र, परिसंवाद होणार असून यामध्ये अनेक तज्ञ विचारवंतांचे मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिक्षक आमदार विक्रम काळे, जयंत आसगावकर, पदवीधर आमदार निरंजन डावखरे, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. महामंडळाच्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, आश्वसित प्रगती योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागू करणे, अनुकंपा तत्वावरील पदांची नियुक्ती, जुनी पेन्शन योजना तसेच वैद्यकीय, रजा देयके असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यावर चर्चा आणि विचारविनिमय आणि संघटनेची पुढील ध्येय धोरणे ठरविली जाणार असल्याची माहिती महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी दिली आहे.
सदर अधिवेशन महत्वपूर्ण असल्याने या अधिवेशनास नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, जळगाव व नाशिक जिल्ह्यातील शिक्षकेतर बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक विभागीय कार्यवाह डी. पी. महाले यांनी केले आहे.
- 1
- 0
- 0
- 0





