नंदुरबार

महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या सुजाता साळवे यांना राज्यस्तरीय संधी

महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या सुजाता साळवे यांना राज्यस्तरीय संधी

समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड

   नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो –          नंदूरबार शहर पोलीस स्टेशन आवारात कार्यरत असलेल्या महिला समुपदेशन केंद्राच्या कार्याला आणखी बळकटी मिळाली असून, केंद्राशी संलग्न असलेल्या संस्कृती बहुउद्देशीय सेवा मंडळाच्या सचिव श्रीम. सुजाता रमाकांत साळवे यांची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळवणुकीच्या तक्रारींची चौकशी करणाऱ्या समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
महिलांच्या न्याय, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य करणाऱ्या श्रीमती साळवे या नंदुरबार शहर पोलीस स्टेशन परिसरातील महिला समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून अनेक महिलांना समुपदेशन, कायदेशीर मार्गदर्शन आणि मानसिक आधार देण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळाच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण व्हावे, तसेच महिलांना सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने स्थापन करण्यात येणाऱ्या समितीमध्ये श्रीम. सुजाता साळवे यांचा अनुभव मोलाचा ठरणार असल्याची भावना सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
त्यांच्या या निवडीमुळे नंदुरबार जिल्ह्याचा राज्यस्तरावर गौरव झाला असून, विविध सामाजिक संस्था, महिला संघटना तसेच प्रशासनातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
   

           “महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या न्यायहक्कांसाठी मी आजवर ज्या समर्पणाने कार्य केले, त्याच निष्ठेने पुढेही कार्य करत राहीन. शासनाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करेन.”
महिला समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून महिलांना आधार देणाऱ्या कार्यकर्त्यांसाठीही ही निवड प्रेरणादायी ठरत असून, नंदुरबार जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला यामुळे नवी ऊर्जा मिळणार आहे.

श्रीमती सुजाता साळवे.                सामाजिक कार्यकर्त्या नंदूरबार 

­ 

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *