नंदुरबार

माजी मुख्यमंत्री  तथा शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा शिवसेना तर्फे रुग्णांना फळ वाटप

माजी मुख्यमंत्री  तथा शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा शिवसेना तर्फे रुग्णांना फळ वाटप

तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो :- माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा शिवसेना तर्फे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.


महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख अरुणआप्पा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना मोफत फळ वाटप करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.


शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक आणि उपक्रमशील कार्यक्रमांद्वारे पक्षप्रमुखांचा वाढदिवस साजरा केला जातो. याच परंपरेला जागून तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील विविध कक्षांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करण्यात आली व त्यांना सफरचंद, केळी
फळांचे वाटप करून . या उपक्रमामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद पाहावयास मिळाला.
याप्रसंगी शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख विपुलभाऊ कुलकर्णी, शहरप्रमुख देवाभाऊ कलाल, युवासेना प्रमुख दीपक शिंपी युवासेना उपशहरप्रमुख हर्षल चौधरी, यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व शिवसैनिक भूषणभाऊ सोनार विजय (पप्पू) मराठे, यशवंत ठाकरे, रामाभाऊ पाडवी, दादू शिंपी, अशोक पाडवी,सुनील शिंपी,अर्जुन धाणका आदी पदाधिकारीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान तालुकाप्रमुख विपुलभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले की, “उद्धवजी ठाकरे यांनी नेहमीच ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या बाळासाहेबांच्या विचारांवर चालण्याचे शिकवले आहे. रुग्णांची सेवा करणे हीच खरी ईश्वरसेवा मानून आज हा उपक्रम राबवण्यात आला आहे.” रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *