नंदुरबार

अक्काराणी लोकसंचालित साधन केंद्र, धडगावची वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळावा उत्साहात संपन्न

अक्काराणी लोकसंचालित साधन केंद्र, धडगावची वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळावा उत्साहात संपन्न

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने अक्काराणी लोकसंचालित साधन केंद्र, धडगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळावा दि. २७ जानेवारी २०२६ रोजी कै. एस. व्ही. हायस्कूल, ठाकूर, धडगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या वेळी CMRC अध्यक्षा सौ. सुरजा बारकू वळवी अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.

या सभेत वार्षिक अहवाल, लेखापरीक्षण अहवाल व कार्य अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच सन २०२५–२६ व २०२६–२७ च्या बिझनेस प्लॅनवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान बालविवाह प्रतिबंध, विविध शासकीय योजना, बँक सखी निवड प्रक्रिया, बिझनेस प्लॅन व नवतेजस्विनी प्रकल्प याबाबत महिलांना सखोल मार्गदर्शन देण्यात आले.

यावेळी GTM व नवतेजस्विनी उपप्रकल्पांची माहिती, तसेच नवीन कार्यकारिणी व निमायक मंडळाची निवड प्रक्रिया पार पडली. जुन्या कार्यकारिणीचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. नवीन CMRC कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात येऊन अध्यक्षा म्हणून सौ. मंदा रायसिंग पाडवी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

GTM अंतर्गत एकूण ८० शासकीय योजनांची माहिती स्थानिक भाषेत देण्यात आली. तसेच हवामान बदलांचा महिलांच्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, शेती व रोजगारावर होणारा परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील बालविवाह ही गंभीर समस्या लक्षात घेता कुपोषण, अपूर्ण शिक्षण, माता-बाल मृत्यू, समान संपत्ती अधिकार व विवाह नोंदणीबाबत जाणीवजागृती व शपथ घेण्यात आली.

या कार्यक्रमात ३८ महिलांनी शबरी वित्त व विकास महामंडळाच्या उद्योग कर्जासाठी तयारी दर्शवली. तसेच उत्कृष्ट उद्योजिका, सहयोगिनी, कर्मचारी व महिला बचत गटांचा गौरव करण्यात आला. महिलांचा उत्साह वाढावा यासाठी भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.

या महिला मेळाव्यामुळे महिलांमध्ये आत्मनिर्भरतेचा संकल्प अधिक दृढ झाला असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

कृषी, आत्मा, बँक, NGO प्रतिनिधी, जिल्हा प्रकल्प सल्लागार, लेखा सहाय्यक (माविम), CMRC अध्यक्ष, व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी, CRP तसेच विविध बचत गटांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Mavim Nandurbar

selfhelpgroups #GTM #womenempowermentmovement

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *