
तळोद्याचे डॉ.आदेश जैन नाशिक शहरात आपले वेगळेपण सिद्ध करणार आ. चंद्रकांत रघुवंशी
नाशिक येथे डॉ.आदेश जैन डेंटल ऍण्ड रूट कॅनल सेंटरचे शानदार उद्घाटन
तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो :-
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा सारख्या छोट्याशा शहरातून येऊन नाशिक सारख्या महानगरात डॉ. आदेश जैन यांनी स्वतःच्या जिद्द व आपल्या बुद्धी कौशल्यावर, आत्मविश्वासाने डेंटल अँड रूट कॅनल स्पेशालिटी सेंटर नाशिक येथील मोठ्या शहरात सुरू करण्याचे धाडस त्यांनी दाखविले आहे.

डॉ. आदेश जैन या युवा दंत चिकित्सकचा हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद असून, ध्येयसिध्द व प्रामाणिकपणा जोपासत आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर दंत रुग्णांना समर्पित भावनेने सेवा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत आपले वेगळीपण सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी नाशिक येथिल डेंटल सेंटरच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी केला.
नाशिक येथे दि.११ मे रोजी वडाळा-पाथर्डी रोडवरील इंदिरानगरात नंदुरबार येथिल विधान परिषद आमदार चंद्रकांतजी रघुवंशी यांच्या शुभहस्ते व माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. आदेश जैन डेंटल अँड रूट कॅनल सेंटरचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला.
सदर या समारंभा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शहादा तळोदा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेशदादा पाडवी, अक्कलकुवाचे आमदार आमश्यादादा पाडवी, नंदुरबारच्या नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी, तळोदाच्या नगराध्यक्षा भाग्यश्री योगेश चौधरी, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांतजी वाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख रामभैय्या रघुवंशी, उपप्रमुख गौतम अनोपचंद जैन, नाशिक मनपा स्थायी समिती सदस्य मच्छिंद्र सानप, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, डॉ.रोशन भंडारी (नंदुरबार) डॉ. सचिन दुग्गड, नाशिक मनपा नगरसेविका वैशालीताई दळवी, गणेश गीते, अँड. श्याम बडोदे, भाजपा गटनेते (नाशिक मनपा), डॉ. नितीन कोचर, डॉ.शितल कर्नावट, डॉ.स्वप्नील कोल्हे, (नाशिक) आदि उपस्थित होते. यावेळी आमदार राजेशदादा पाडवी यांनी तळोदा सारख्या छोट्याशा शहरात जन्मलेल्या डॉ. आदेश जैन यांनी दंत वैदयकिय क्षेत्रातील एम. डी. एस. चे उच्च शिक्षण घेऊन नाशिक सारख्या मोठया शहरात डेंटल सेंटर सुरू केले आहे ही बाब तळोदा शहरवासियानसाठी भूषणावह बाब म्हणाली लागेल.
आपल्या डेंटल सेंटरच्या माध्यमातून नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील गोरगरीब दंत रुग्णांना देखिल लाभ होईल व त्यांचे दाताचे दुखणे दूर होऊन,त्यांना सदृढ आरोग्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
या उद्घाटन सोहळ्याला रा. काँ. चे योगेशभाऊ चौधरी, माजी नगराध्यक्ष अजयभैया परदेशी, नगरसेवक जितू दुबे, कल्पेश चौधरी, सुरज माळी, रमेश भोई, नवनीत शिंदे, बबन चौधरी, निसारदादा मक्राणी, पिपल बँकेचे संचालक अरविंद बोधरा, प्रसादभाऊ सोनार, आनंद सोनार, जहिरभाई, राजेंद्र पाटील, हंसु भंडारी, दिनेश बोधरा, दिलीप सेठीया, भरत ओसवाल, सुभाष शेठीया, अनोपचंद बोधरा, संतोष चोपडा, अमित कोचर, गुड्ड पारस, दिलीप भामरे, संजय वाणी, तसेच
तळोदा येथील सेठीया परिवारातील गुलराज जैन, चंपालाल जैन, पराग जैन, संतोषचंद जैन, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गौतमचंद अनोपचंद जैन, राजेंद्रकुमार अनोपचंद जैन, महावीर जैन, कुमारपाल जैन, यांच्यासह शहरातील राजकीय,सामाजिक, व्यापारी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- 0
- 0
- 0
- 0





