
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

नंदुरबार | दि. 11 सप्त नगरी न्यूज ब्युरो
अक्राणी तालुक्यातील तोरणमाळ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी तोरणमाळ महोत्सवाच्या तयारीचा सविस्तर आढावा आज घेण्यात आला. महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसुविधा व व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशासनाकडून विविध बाबींची पाहणी करण्यात आली.

यावेळी पर्यटकांसाठी उपलब्ध निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, स्वच्छता तसेच अन्य मूलभूत सुविधा तपासून पाहण्यात आल्या. महोत्सवाच्या कालावधीत पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन व गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच महोत्सवाच्या आधी होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसरात स्वच्छता व कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्याबाबत मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश दिले. महोत्सव स्थळ परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी मा. आमदार आमशादादा पाडवी यांनी तोरणमाळ महोत्सवास दरवर्षी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे नमूद केले. महोत्सव अधिक आकर्षक व यशस्वी करण्यासाठी प्रशासन, स्थानिक यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पर्यटन, सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक विकासाला चालना देणारा तोरणमाळ महोत्सव जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
ToranmalFestival #Nandurbar #TourismDevelopment #CleanTourism #MahashivratriYatra #DistrictAdministration #PublicFacilities #MaharashtraTourism #LocalDevelopment #EcoTourism
- 0
- 0
- 0
- 0





