
तळोद्यातील प्रमुख वास्तूंना लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्याची शिवसेनेची निवेदनात मागणी
तळोदा : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर झटलेले, महाराष्ट्रातील कामाचा माणूस म्हणून ओळखले जाणारे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत स्व. अजित पवार यांची विकासगाथा तळोदा वासियांच्या स्मरणात सदैव राहावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने नगर परिषद तळोदा येथे निवेदन सादर करण्यात आले आहे.
याबाबत निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्व. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राला देशातील प्रथम क्रमांकाचे विकसित राज्य बनविण्याच्या ध्येयाने अखेरच्या श्वासापर्यंत कार्य केले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून तळोद्यातील पूर्णतः वास झालेल्या किंवा नव्या विकास योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या मोठ्या सार्वजनिक वास्तूंना त्यांचे नाव देण्यात यावे. विशेषतः मुख्य बाजारपेठेतील भाजीपाला मार्केटला लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर अनुपकुमार उदासी शिवसेना तालुका अध्यक्ष तथा, नगरसेवक, संदिप परदेशी लोकसभा उपाध्यक्ष, हितेंद्र क्षत्रिय नगरसेवक, सौ. प्रतिक्षा दुबे नगरसेविका, सौ.अनिता परदेशी नगरसेविका, मोनिका माळी नगरसेविका न.पा. तळोदा, कपिल कर्णकार नगरसेवक, शेख नदिम शे युनुस नगरसेवक, सुरज रमेश माळी, नितेश सोनार, विक्की पाडवी, विक्की मंसूरी, इमरान शिकलीकर, कल्पेश माळी यांच्या सह्या आहेत. नगरपालिकेने या मागणीची तातडीने नोंद घेऊन लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे..
- 0
- 0
- 0
- 0





