
गांधी संस्कार परीक्षेत डोंगऱ्यादेव विद्यालयाचे यश
नंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो
नंदुरबार तालुका विधायक समिती, संचलित श्री डोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालय, कोकणीपाडा येथील विद्यार्थ्यांनी गांधी संस्कार परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

सशक्त, बलशाली, वैचारिकदृष्ट्या समृद्ध व अहिंसक समाज निर्मितीसाठी अहिंसा, प्रेम, साधी राहणी व शांतीचा संदेश अखिल विश्वाला देणाऱ्या महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान पुढील पिढीला देणे आवश्यक ठरेल या उद्देशाने गांधी रिसर्च फाउण्डेशन यांच्या मार्फत दरवर्षी महात्मा गांधी जयंती निमित्त “गांधी विचार संस्कार परीक्षा” घेण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून भारतासह अनेक देशातील 25 लाखाहून अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी या परीक्षेत सहभाग नोंदवला असून या वर्षी श्री.डोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी सिमरन दिनेश वळवी आणि पूनम धनसिंग नाईक यांनी जिल्ह्यातून संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले असून, दर्शना दिनेश नाईक, सोनल भावराम वळवी व वैष्णवी संदिप कोकणी यांनी जिल्ह्यातून संयुक्तपणे द्वितीय क्रमांकाचे रौप्य पदक मिळविले, आणि ज्योती जितेंद्र वळवी, तनिषा रविंद्र नाईक यांनी जिल्ह्यातून संयुक्तपणे तृतीय क्रमांकाचे कांस्यपदक मिळविले. त्याच बरोबर शाळेच्या यशाबद्दल स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
या परीक्षेचे नियोजन व समन्यवक म्हणून शाळेचे उपशिक्षक वसंत वळवी यांनी कामकाज पाहिले. शाळेचे मुख्याध्यापक राजेश गांगुर्डे व सहकारी शिक्षक यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आमदार चंद्रकांत रघुवंशी, व्हा.चेअरमन मनोज रघुवंशी, सचिव यशवंत पाटील व कार्यालयीन अधीक्षक पुष्पेंद्र रघुवंशी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
- 0
- 0
- 0
- 0





