नंदुरबार

बौद्ध संस्थांना पायाभूत सुविधांसाठी 10 लाखांपर्यंत अनुदान;20 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेशशांक काळे

बौद्ध संस्थांना पायाभूत सुविधांसाठी 10 लाखांपर्यंत अनुदान;
20 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावे
शशांक काळे

नंदुरबार, दिनांक 03 फेब्रूवारी, 2026 (जिमाका वृत्त) :
राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या आणि बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, पात्र संस्थांनी आपले प्रस्ताव 20 फेब्रूवारी, 2026 पर्यंत जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी शशांक काळे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या संस्था ही धर्मादाय आयुक्तांकडे अधिकृतपणे नोंदणीकृत असावी. संस्थेच्या विश्वस्त मंडळात किंवा सदस्यांमध्ये 51 टक्क्यापेक्षा जास्त सदस्य बौद्ध समाजातील असणे अनिवार्य असून संस्था प्रामुख्याने बौद्ध समाजासाठी सांस्कृतिक, शैक्षणिक किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असावी. रुपये 10 लाखाचे प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावे, असेही जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी, श्री. काळे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *