नंदुरबार

तळोदा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सैनिकांचे यश

तळोदा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सैनिकांचे यश

तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना एककातील द्वितीय वर्षातील बी प्रमाणपत्र उत्तीर्ण दोन कॅडेट्स आणि तृतीय वर्षातील सतरा छात्रसैनिकांनी सी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सचा प्रमाणपत्र देवून गुणगौरव करण्यात आला. गुणगौरव कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यापक शिक्षण मंडळ संचलित कला वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे उपाध्यक्ष इंजिनियर रोहितभाऊ माळी यांनी छात्रसैनिकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, नेतृत्वगुण आणि शिस्त निर्माण होत असल्याचे सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांना कोषाध्यक्ष लक्ष्मण बबनराव माळी महाविद्यालय कार्यकारी मंडळाचे सदस्य उखाभाऊ गणपत पिंपरे, सहसचिव- अरविंद हिरालाल टवाळे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील सेवा आणि रोजगाराच्या संधीसाठी शुभेच्छा दिल्यात. महाविद्यालयाचे प्राचार्यं तथा सचिव डॉ. हेमंत दलाल यांनी महाविद्यालयीन शिक्षणासोबत राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कवायत, सैनिकी प्रशिक्षण, नकाशवाचन यातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक, शारीरिक, मानसिक व्यक्तिमत्त्व विकासाच्या गुणांची जडणघडण होत असते यातूनच विद्यार्थ्यांना उज्च्वल भविष्य घडत असते असे प्रतिपादन केले.
४९ महाराष्ट्र बटालियन अमळनेरचे समादेशक अधिकारी कर्नल अमित रे तसेच लेफ्टनंट कर्नल पिनाकी बनिक यांनी देखील यशस्वी छात्रसैनिकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाच्या प्रस्तावित राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. राजू यशोद यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र सेना विभागातील सर्व कॅडेट्रस उपस्थित होते.

राष्ट्रीय छात्र विभागातील संधी
राष्ट्रीय छात्र सेना विभागातील यशस्वी छात्र सैनिकांना भारतीय सैन्य दलात अग्निवीर, अधिकारी, पोलीस तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये पाच ते वीस बोनस पॉइंटस व काही ठिकाणी राखीव जागा दिल्या जातात. काही भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा माफ होत असते यातून विद्यार्थ्यांना मोठे बळ मिळत असते. योग्य मार्गदर्शन, जिद्द, चिकाटी, नियमित कवायत, सराव, वेळेचे नियोजन व नियोजनबद्ध अभ्यास केला, तर निश्चितच यश साध्य करता येते. म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षात प्रवेश घेतल्यानंतर राष्ट्रीय छात्र सेना विभागाशी जोडून घेणे आवश्यक आहे.
विभाग प्रमुख
लेफ्टनंट डॉ. राजू यशोद
राष्ट्रीय छात्र सेना विभाग
कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, तळोदा

  • 0
  • 1
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *