नाशिक

नाशिकमध्ये अंमली पदार्थांवर मोठी कारवाई… राजस्थानचा गॅस रिपेअरर पोलिसांच्या जाळ्यात

नाशिकमध्ये अंमली पदार्थांवर मोठी कारवाई… राजस्थानचा गॅस रिपेअरर पोलिसांच्या जाळ्यात, तब्बल ५१ किलो ‘डोडा’ अफूची बोंडे व चुरा जप्त!….

नाशिक शहरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने (गुन्हे शाखा) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. पंचवटी परिसरातील दत्त नगरमध्ये गॅस रिपेअरिंगच्या आडून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या राजस्थानच्या एका इसमाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे.

सुभाष मंगलाराम बिश्नोई (वय ४२ वर्षे, मूळ रा. जोधपूर, राजस्थान). तो गेल्या १० वर्षांपासून नाशिकमध्ये राहत होता.

७,६६,०९५ रुपये किमतीचा ५१.०७३ किलो ‘डोडा’ (अफूची बोंडे व चुरा) आणि इतर साहित्य, असा एकूण ८,८३,४९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त.

गुप्त माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने आरोपीच्या घरावर छापा टाकून हा साठा जप्त केला.

आरोपीविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा अमली पदार्थांचा साठा नाशिकमध्ये कोणाला पुरवला जाणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व त्यांच्या पथकाने केली आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *