यशस्वी अभियानाबद्दल आरोग्य सेविका
लीना हिरणवाळे सह टीमचा विशेष पुरस्काराने सन्मान

नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो :- राज्य
शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज शिबीर अंतर्गत अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राने सन 2025 ते 2026 मध्ये झालेल्या दोनशे सात यशस्वी प्रसुती बदल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत बागलाण तालुक्यातील अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेविका लीना हिरणवाळेसह टीमचा सत्कार कळवणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. याप्रसंगी अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि अलियाबाद व वाघम्बा येथील आशा सेविका उपस्थित होत्या.
लीना हिरणवाळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून पत्रकार महादू हिरणवाळे आणि सुनिता हिरणवाळे दाम्पत्याची कन्या आहे.
फोटो कॅप्शन – कळवण तालुक्यातील अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राने यशस्वी आरोग्य अभियान राबविल्या बद्दल आ. दिलीप बोरसे यांच्या हस्ते आरोग्य सेविका लीना हिरणवाळेसह टिमचा गौरव करण्यात आला.
- 0
- 0
- 0
- 0





