नंदुरबार

माध्यमिक विद्यालय आमलाड व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

माध्यमिक विद्यालय आमलाड व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो

विद्यासहयोग बहुउ्देशीय संस्था संचलित माध्यमिक विद्यालय आमलाड व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिर आमलाड येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन व्ही मराठे होते.

                 याप्रसंगी विज्ञान शिक्षक एस ए सूर्यवंशी यांनी विज्ञानांचे महत्त्व, विज्ञानामुळे झालेली प्रगती, समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा मागील वैज्ञानिक कारण याबद्दल माहिती दिली. तर श्रीमती जान्हवी गोसावी यांनी विदयार्थ्यांना विविध कुतूहल निर्माण करणारं प्रयोग करून दाखवत त्यामागील वैज्ञानिक कारण सांगितले.
                    यावेळी विदयार्थ्यांन मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, अचूक व चिकिस्तक निरीक्षण करावे, पर्यावरण व देशाचा हितासाठी चांगले संशोधन करावे यासाठी भारतीय शास्त्रज्ञानची केलेल्या संशोधनांची व कार्याची माहिती टीव्ही वर दाखवण्यात आली. याप्रसंगी शाळेतील शिक्षक आर बी कुवर, ए ए शेंडे, बी बी भामरे, डी एन गिरासे, आर के पाडवी, वाय एस मासुळे, श्रीमती सुनीता शिंदे, श्रीमती शीतल ठाकरे, श्रीमती जान्हवी साळी व विद्यार्थी उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *