नंदुरबार

राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) मा. विकास खारगे यांची नांदरखेडा आयुष्मान आरोग्य मंदिराला भेट; आरोग्य सेवांचा घेतला सखोल आढावा

राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) मा. विकास खारगे यांची नांदरखेडा आयुष्मान आरोग्य मंदिराला भेट; आरोग्य सेवांचा घेतला सखोल आढावा

नांदरखेडा, नंदुरबार | दि. १२ जून २०२६

ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रभावीपणे मिळत आहेत का, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) मा. श्री. विकास खारगे यांनी आज आयुष्मान आरोग्य मंदिर (HWC), नांदरखेडा येथे भेट देऊन विविध आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला.

या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  भेटीदरम्यान RCH सेवा, e-SUCHI App, सिकल सेल कार्यक्रम, उच्च जोखीम गरोदर मातांचे व्यवस्थापन तसेच 104 टोल-फ्री आरोग्य हेल्पलाईन याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.

  आरोग्य संस्थेतील नोंदी, सेवा वितरण व्यवस्था, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि विविध आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

   विशेषतः उच्च जोखीम गरोदर माता, माता-बाल आरोग्य सेवा आणि सिकल सेल प्रतिबंधक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.

   या भेटीमुळे आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थांमध्ये आरोग्य सेवांबाबत अधिक जागरूकता निर्माण झाली असून ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या प्रयत्नांना नवे बळ मिळाले आहे.

   “शासनाच्या आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचणे हीच प्रशासनाच्या कार्याची खरी यशस्विता आहे.”

Nandurbar #AyushmanArogyaMandir #HealthForAll #ESUCHI #RCHServices #SickleCellMission #HighRiskPregnancyCare #PublicHealth #DrMittaliSethi #VikasKharge #NandurbarHealth #GoodGovernance #HealthyNandurbar #MaharashtraGovernment #HealthActionCentre #JansamparkNandurbar

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *