नंदुरबार जिल्हा परिषद मुख्यालयात ७९ वा स्वातंत्र्यदिन थाटात साजरा; मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण
नंदुरबार: दि. १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद नंदुरबार मुख्यालयात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, मा. श्री नमन गोयल (भाप्रसे) यांच्या शुभहस्ते मुख्य इमारतीच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावून तिरंग्याला सलामी देण्यात आली.

या सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषदेचे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी वंदे मातरम, राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन करून भारतमातेला अभिवादन केले.

सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुणवंतांचा सत्कार
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मुख्यालयाच्या प्रांगणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभक्तीपर गीतावर शालेय विद्यार्थींनी नृत्य सादरीकरुन करुन उपस्थितांची मने जिंकली.
याच कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला.
प्रशासनाला गती देणे आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
“स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी केवळ एक सण नसून देशसेवेची आणि ग्रामीण भागाच्या विकासाची शपथ पुनरुच्चारण्याचा दिवस आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहावे.” — नमन गोयल (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक, जि. प. नंदुरबार
- 0
- 0
- 0
- 0





