ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन! मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल(भाप्रसे) यांची मालपूर येथील ‘झालावाडी शेळीपालन केंद्रास’ भेट देऊन पाहणी!

नंदुरबर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये उपजीविकेचे साधन बळकट करण्यासाठी आणि महिला तसेच स्थानिक घटकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल(भाप्रसे) यांनी दि. १३ ऑगस्ट रोजी नंदुरबार तालुक्यातील मालपूर येथील ‘झालमुडी प्रकल्पा’स भेट देऊन तेथील झालावाडी शेळीपालन व्यवसाय केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली.

प्रकल्पाची पाहणी अन् प्रत्यक्ष संवाद.
मालपूर येथील या भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शेळीपालन केंद्रातील व्यवस्थापन, शेळ्यांच्या आरोग्याची काळजी, चारा व पाण्याची सोय, तसेच पैदास (Breed Management) याबाबत सविस्तर माहिती घेतली.

झालावाडी शेळ्यांच्या वैशिष्ट्यांचा आढावा घेत असताना, हा व्यवसाय अधिक फायदेशीर कसा बनवता येईल आणि त्याद्वारे ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न कसे वाढवता येईल, यावर त्यांनी भर दिला.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन
या पाहणी दौऱ्यादरम्यान संबंधित अधिकारी व व्यवसाय सुरू करणाऱ्या लाभार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या:
शास्त्रीय व्यवस्थापन: शेळीपालनात आधुनिक तंत्रज्ञान व आरोग्याची योग्य काळजी (लसीकरण व आहार) घेण्याचे आवाहन केले.
बाजारपेठ जोडणी: शेळीपालनातून मिळणाऱ्या उत्पादनांना आणि शेळ्यांच्या विक्रीला योग्य बाजारपेठ (Market Linkage) मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
• शासकीय योजनांचा मेळ: जिल्हा परिषदेच्या व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ ग्रामीण भागातील उद्योजकांनी घ्यावा, असे त्यांनी सुचवले.

उपजीविकेचा भक्कम आधार.
शेळीपालन हा ग्रामीण भागात अतिशय कमी भांडवलात चांगला परतावा देणारा आणि पूरक व्यवसाय आहे. मालपूर येथील झालावाडी शेळीपालन केंद्रामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या आणि आर्थिक स्वावलंबनाच्या नव्या वाटा खुल्या होत असून, इतर गावांसाठीही हा प्रकल्प एक आदर्श मॉडेल ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
- 0
- 0
- 0
- 0





