नंदुरबार

रामनामाच्या जयघोष: हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम विजय महोत्सवाला प्रारंभ,शोभा यात्रेने वेधले लक्ष; पारंपारिक वाद्यांसह ढोल-ताशांच्या गजर

रामनामाच्या जयघोष: हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम विजय महोत्सवाला प्रारंभ

शोभा यात्रेने वेधले लक्ष; पारंपारिक वाद्यांसह ढोल-ताशांच्या गजर

नंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो

हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि पारंपारिक वाद्यांसह ढोल-ताशांच्या गजर अन् रामनामाच्या जयघोषात करणखेड्यात शोभायात्रेने श्रीराम विजय महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. सकाळी निघालेल्या शोभायात्रेने संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष वेधून घेतले होते.३ दिवस चालणाऱ्या महोत्सवाने भाविक भक्त भक्तीरसात राहून निघाले आहेत

मागील वर्षाप्रमाणे यंदाही श्री श्री १०८ महंत संत तारादास बापू महाराज यांच्या नेतृत्वाखाली अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माणनिमित्त नंदुरबार तालुक्यातील करणखेडा येथे श्रीराम सेवा समिती,राजाराम मंदिर भक्तीधाम, बद्रीझीरा व जय सियाराम भक्त परिवाराच्या वतीने श्रीराम विजय महोत्सवाला मंगळवारी उत्साहात सुरुवात झाली. शोभा यात्रेला सुंदरदे गावातील गणपती मंदिरापासून ९ वाजेला सुरुवात झाली. शोभा यात्रेच्या सुरुवातीला संत तारादास बापू यांनी पूजाअर्चा केली.

शोभायात्रेत अग्रभागी सहभागी झालेल्या युवती व महिला भाविकांनी धार्मिक गीतांवर ठेका धरला होता सवारी’, ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला’ अशा एक ना अनेक भक्ती गीतांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. त्याचप्रमाणे पारंपारिक आदिवासी नृत्यनेदेखील रंगत आणली. शोभायात्रेत ठिकठिकाणी सहभागी झालेल्या भक्तांवर शोभिवंत रंगबिरंगी कागदांचे फवारे उडवण्यात येत होते. श्रीराम विजय महोत्सवाच्या निमित्ताने सुंदरदे गावातून ते करणखेडा गावातील महोत्सव स्थळापर्यंत सजवण्यात आलेल्या वाहनांमध्ये विविध साधू संत,महंत विराजमान झालेले होते. या वाहनांवर ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली.

सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष

ग्रामीण भागातून आलेल्या आदिवासी कलाकारांनी नंदीनृत्याचे सादरीकरण केले. डफांच्या तालावर नंदी नृत्याने लक्ष वेधून घेतले होते.राम-लक्ष्मण,सीता,हनुमान,महादेव आणि देवीच्या सादर करण्यात आलेला देखावा शुभयात्रेचे आकर्षण ठरले.

हलगीच्या तालावर धरला ठेका

शोभायात्रेत सहभागी झालेल्या भाविक भक्तांनी हलगीच्या तालावर ठेका धरल्याचे दिसून आले. हलगी जसजशी वाजवण्यात येत होती तसतसे भाविक देखील उत्साहाने नाचत होते. यावेळी जय श्री रामाच्या जयघोष करण्यात आला.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *