तंत्रज्ञान व विज्ञान नंदुरबार

बंगलोर विज्ञान संवर्धन कार्यक्रमासाठी जवाहर नवोदय विद्यालयाचा जयेंद्र पावरा याची निवड

 बंगलोर विज्ञान संवर्धन कार्यक्रमासाठी जवाहर नवोदय विद्यालयाचा जयेंद्र पावरा याची निवड

अक्कलकुवा |सप्त नगरी न्यूज ब्युरो

अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी मास्टर जयेंद्र पावरा याची देशातील अग्रगण्य शिक्षण व संशोधन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर येथे आयोजित विज्ञान संवर्धन कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.
अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 11वी मध्ये शिकणारा मास्टर जयेंद्र पावरा याची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर या देशातील अग्रगण्य शिक्षण व संशोधन संस्थेत राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान संवर्धन कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. विज्ञान संवर्धन कार्यक्रम हा विज्ञानावर आधारित एक महिन्याचा विशेष शैक्षणिक कार्यक्रम असुन तो २७ एप्रिल ते ३० मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातील विविध प्रांतातून व शाळेतून निवडक प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळेत काम करण्याची संधी, विविध वैज्ञानिक प्रयोग, नामांकित वैज्ञानिकांचे मार्गदर्शन तसेच संशोधन प्रक्रियेची प्रत्यक्ष ओळख करुन देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्ह्याला प्रथमच मास्टर जयेंद्र पावरा याच्या माध्यमातून संधी मिळाली आहे या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड होणे ही केवळ नवोदय विद्यालयासाठीच नव्हे तर संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. त्याच्या या यशाबद्दल नवोदय विद्यालय समितीच्या अध्यक्ष व जिल्हाधिकारी मिताली सेठी, विद्यालयाचे प्राचार्य विलास पाटील व नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अभिनंदन केले आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *