नंदुरबार

नेमसुशिल शैक्षणिक समूहात हळदी कुंकूचे कार्यक्रम सोहळा

नेमसुशिल शैक्षणिक समूहात हळदी कुंकूचे आयोजन

तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो

तळोदा शहरातील नेमसुशिल समूहात हळदीकुंकू सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सोनाभाभी तुरखीया होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील नवनिर्वाचित महिला नगरसेविका अनिताताई परदेशी, प्रतिक्षाताई दुबे, मोनिकताई सुरज महाजन, गायत्रीताई क्षत्रिय, ह्या होत्या. तर नेमसुशिल स्नेह सखी सौ. कुवरबेन पटेल, नलिनी शाह, रूपल वाणी, ह्या होत्या.

            यावेळी सौ दिपाली देवरे यांनी भोगीच्या सणांच्या विविध वस्तूंचे विविध मांडणी करून सुंदर देखावा सादर केला. महिला शिक्षकांनी रेट्रो थीम आपल्या वेशभूषेतून प्रस्तुत केली. विविध उखाणे गाणे ओव्या यांच्या माध्यमातून भगिनींना आपल्या यजमानांचे आकर्षक पद्धतीने नाव घेतले. व त्याबद्दल महिलांना संस्थेमार्फत आकर्षक बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

              रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मोकळा श्वास म्हणून विविध मनोरंजनात्मक खेळांचे देखील आयोजन करण्यात आले. अनुक्रमे स्पर्धेत प्रथम द्वितीय क्रमांक काढण्यात आला व बक्षीस देखील वाटप करण्यात आले. जॅकपॉटच्या माध्यमातून सरप्राईज गिफ्ट देऊन सन्मान करण्यात आला. सर्व भगिनींच्या वतीने सौ मोहिनीताई धनगर यांनी आपल्या मनोगतातून शाळेची शिस्त नियम दर्जेदार शिक्षणाबद्दल कौतुक केले.

                   कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ पुष्पा बागुल, मॅडम भावना डोंगरे, कल्याणी वडाळकर, अर्चना पाडवी मनीषा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रेखा मोरे, प्रतिभा बैसाणे व भोपे  यांनी केले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *