नंदुरबार

पद्मश्री भिकल्या दिंडा यांच्या हस्ते कवी संतोष यांना “आदिसाहित्य पुरस्कार हेम्टू (अतिक्रमण) या आदिवासी पावरी हिंदी द्विभाषिक कविता संग्रहास पुरस्कार

पद्मश्री भिकल्या दिंडा यांच्या हस्ते कवी संतोष यांना “आदिसाहित्य पुरस्कार

हेम्टू (अतिक्रमण) या आदिवासी पावरी हिंदी द्विभाषिक कविता संग्रहास पुरस्कार

आदिवासी कला साहित्य संस्कृती अकादमी व संकल्प युवा जागृती संघटना महाराष्ट्र आयोजित पाहिले आदिवासी साहित्य संस्कृती संमेलन नाशिक येथे पार पडले.

यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील युवा कवी साहित्यिक संतोष पावरा यांच्या हेम्टू (अतिक्रमण) या आदिवासी पावरी हिंदी द्विभाषिक कविता संग्रहाला प्रमुख मान्यवर पद्मश्री भिकल्या दादा दिंडा, ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, कुसुम ताई आलम, डॉ संजय लोहकरे, तुकाराम दांडे , डॉ मधुचंद्र भुसारे चेतन खंबाईत सुहास नाईक, भीमसिंग पवार आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

      शाल, शिफळ ट्रॉफी सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे स्वरूप होते. यावेळी देशभरातून अनेक साहित्यिक रसिक आणि कलाकार व समाज बांधव उपस्थित होते.
या संमेलनात अनेक हेम्टू हा पावरी बोली भाषेतील शब्द असून याचा अर्थ अतिक्रमण असा होतो. प्यारा केरकेट्टा फाउंडेशन झारखंड द्वारा 2023मध्ये प्रकाशित झालेल्या या साहित्य कृतीला यापूर्वी ही राष्ट्रीय बिरसा मुंडा अवॉर्ड आणि जयपाल ज्युलियन हन्ना असे सन्मान मिळाले आहेत. पावरा यांची कुपोषण नावाची कविता सद्या कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश करण्यात आले आहेत तर त्यांच्या एकूणच सामाजिक साहित्यिक कार्यासाठी अनेक स्तरावरून आता पर्यंत विविध सन्मान ही मिळाले आहेत.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *