नंदुरबार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा कोपर्ली परिसरात क्षेत्रीय पाहणी दौरा संपन्न

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा कोपर्ली परिसरात क्षेत्रीय पाहणी दौरा संपन्न

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार श्री. शंकर किरवे यांचा नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली परिसरात विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची क्षेत्रीय पाहणी दौरा संपन्न झाला.

यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. एस. एस. राजपूत, उपकृषी अधिकारी श्री. करणसिंग गिरासे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी श्री. सचिन दराडे, श्री. दीपक राजपूत, श्री. अविनाश पिंपळे, श्री. मंदार पाटील, श्री. प्रवीण अहिरे व श्री. राहुल बत्तीसा उपस्थित होते.

१) मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड पाहणी:
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवडीची पाहणी करण्यात आली. मौजे वडवद – शेतकरी सौ. स्मिताबाई रामेश्वर पाटील
केळी लागवड – क्षेत्र १.२० हे.

मौजे वडवद – शेतकरी सौ. स्मिताबाई रामेश्वर पाटील
केळी लागवड – क्षेत्र १.२० हे.

मौजे मांजरे – लाभार्थी श्री. जगतसिंग पदमसिंग गिरासे
बोर लागवड – क्षेत्र ०.५० हे.

यावेळी काढणी, पॅकिंग व विपणन व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

२) राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन अंतर्गत हरभरा पीक प्रात्यक्षिक:
शेतकरी सौ. संगीता शरद पाटील यांच्या हरभरा पीक प्रात्यक्षिकाची पाहणी करून तांत्रिक मार्गदर्शन देण्यात आले.

३) महा विस्तार AI अ‍ॅप नोंदणी कॅम्प – काकर्दे
शेतकऱ्यांना डिजिटल सेवा, नोंदणी प्रक्रिया तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी महा विस्तार AI अ‍ॅपद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

४) मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत शेततळे पाहणी:
होळ तर्फे रनाळे – शेतकरी सौ. विमलबाई शिवाजी पाटील
शेततळे आकारमान: ३० x २५ x ३ मीटर
खोदकाम अनुदान: ₹७५,०००
अस्तरीकरण अनुदान: ₹६७,७२८
तसेच राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत अवजार बँकेची पाहणी लाभार्थी सौ. सरलाबाई शांताराम पाटील यांच्या ठिकाणी करण्यात आली.

५) एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम:
पॅक हाऊस उभारणीची पाहणी लाभार्थी सौ. भाग्यश्री दशरथ गिरासे यांच्या ठिकाणी करण्यात आली.

६) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत प्रकल्प उद्घाटन:
सातुर्खे येथे लाभार्थी श्री. मनोज अशोक पटेल यांच्या मंजूर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

या पाहणी दौऱ्यात विविध शासकीय योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, लाभार्थ्यांशी संवाद व तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी सक्षमीकरण, उत्पादनवाढ आणि शाश्वत शेती विकासाच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला.

collectorofficenandurbar #agriculturelife #nandurbar

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *