महाराष्ट्र लातूर

मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

उदगीर / सप्त नगरी न्यूज ब्युरो
उदगीर मध्ये एप्रिल या महिन्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन होत असून या ठिकाणी एक संपर्क कार्यालय उभारण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
               लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी
एप्रिलच्या तिस-या आठवड्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं 44 वं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. अधिवेशनाला 2500 पत्रकार उपस्थित राहतील.त्यादृष्टीनं नियोजन करण्यात येत आहे. या तयारीची पाहणी करण्यासाठी नुकतेच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर हे उदगीर मध्ये होते. तयारीच्या दृष्टीनं त्यांनी या ठिकाणी असलेल्या अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या. त्याच बरोबर शहरात नव्याने 44 व्या अधिवेशनाच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन एस.एम.देशमुख यांनी केले.यावेळी बोलताना त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीचं केंद्र असलेल्या उदगीर शहरात परिषदेचं हे अधिवेशन नक्की यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी शरद पाबळे, मिलिंद अष्टीवकर, सचिन शिवशेट्टे यांची भाषणं झाली. यावेळी उदगीर मधील स्थानिक पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *