नंदुरबार

नेमसुशिल बालसंस्कार केंद्रात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

नेमसुशिल बालसंस्कार केंद्रात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

तळोदा :- शहरातील नेमसुशिल बालसंस्कार केंद्रात आषाढी एकादशीचा पवित्र सण भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मुख्या.श्रीमती पुष्पा बागुल वरिष्ठ शिक्षक संदिप चौधरी उपस्थित होते. प्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक विठ्ठलाची वारी साकारत वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जिवंत केली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल, रुख्मिणी माता, संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत गोरा कुंभार, संत तुकाराम महाराज यांसारख्या संतांच्या वेशभूषा व भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारल्या. टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग आणि नामस्मरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार, भक्ती, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले.
हा सुंदर आणि संस्कारमय उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका अर्चना पाडवी मॅडम, संगीता पाटील मॅडम आणि अलका पाडवी मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि उत्साहाने कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *