नंदुरबार

एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती व वृक्षदिंडी, ग्रीन फूट स्टेप च्या उपक्रम..

एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती व वृक्षदिंडी­, ग्रीन फूट स्टेप च्या उपक्रम..

तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:-

तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत पर्यावरण जागृती रॅली व वृक्षदिंडी व ग्रीन फूट स्टेप उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक यांनी पर्यावरणाचे महत्त्व व मानवी जीवन यांच्या परस्पर संबंध याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच शाळेतील इको क्लब मार्फत कॉलनी परिसरात पर्यावरण जागृती व वृक्षदिंडी ची रॅली काढण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती साठी पोस्टर्स व बॅनर तयार केले होते. विद्यार्थ्यांच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला. झाडे लावा झाडे जगवा ह्या घोषवाक्यांनी नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली. नंतर शाळेतील परिसरात इयत्ता पहिलीच्या व दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापकांनी वृक्षारोपण केले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागरूकता कविता सादर केली. तर दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती संदेश व नृत्य सादर सादर केले.

यावेळी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सीड बॉल तयार करून सुट्टीच्या दिवशी फिरायला गेल्यास ते सिडबॉल निसर्गात टाकण्यात येतील जेणे करून त्या सीड बॉल मधून रोप तयार होईल.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *