
राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन संपन्न
तळोदा : राजमाता अहिल्याबाई होळकरह यांच्या ३0१ व्या जयंतीनिमित्त सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी समाजासाठी दिलेल्या महान योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांनी मंदिरांचे जिर्णोद्धार, विहिरी बांधणे, रस्ते निर्माण, वृक्षारोपण तसेच समाजप्रबोधनाचे कार्य करून समाजहितासाठी मोठे योगदान दिले असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमात राजमाता अहिल्याबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश, विजय सोनवणे, दत्तूभाऊ पाटील, प्रल्हाद मिस्तरी, विजय कसबे तसेच मायकी सक्सेना आदी उपस्थित होते.
- 0
- 0
- 0
- 0





