कुवा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबीर संपन्न..
सातपुडा समग्र विकास फाउंडेशन व माता कणी कन्सरी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरचा उपक्रम.

अक्कलकुवा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मोलगी ब्लॉक मधील कुवा सातपुडा समग्र विकास फाउंडेशन व माता कणी कन्सरी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी, मोफत दंत तपासणी तसेच मोफत औषधोपचार शिबिर पार पडले. एकूण ९६ रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे वितरित करण्यात आली.

अक्कलकुवा तालुक्यातील कोठली, कुवा, खाई, कोटीनगर, मोगरा, गोरजाबारी अश्या सहा विविध पाड्यांतून रुग्ण उपचारासाठी आले होते.
त्या भागात प्रचंड प्रमाणात पाऊस असताना सुद्धा शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला. एकूण ९६ रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे वितरित करण्यात आली.

- त्यात डायबिटीस – 07, उच्च रक्तदाब – 13,
दातांचे विकार – 19, किडनी स्टोन – 02, गलगंड – 01, शरीरावरील गाठी – 02,
लहान मुले – 05, नवजात शिशू – 02, शिबिरास
डॉ. निकुंज शाह (दंतरोग तज्ञ),
डॉ. उमेश जाधव (जनरल सर्जन),
डॉ. सारंग माळी (फॅमिली फिजिशियन), डॉ. गौरव कोंगळे (अंतर्वासिता विद्यार्थी) व डॉ. समृध्दी ठाकूर (अंतर्वासिता विद्यार्थी) तज्ञ डॉक्टरांनी रुग्णाची. तपासणी करत औषध उपचार केलेत.
या शिबिराच्या नियोजनासाठी सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ संचलित माता कणी कन्सरी प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख निखिल किन्हेकर व त्या प्रकल्पातील सर्व कार्यकर्त्यांचे अनमोल सहकार्य लाभले.
- 0
- 0
- 0
- 0





