तळोदा तहसील कार्यालयात महसूल आढावा बैठक संपन्न
तळोदा | दि. 07 सप्त नगरी न्यूज ब्युरो:-तळोदा येथील तहसील कार्यालय सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती लघिमा तिवारी, भा.प्र.से. यांच्या अध्यक्षतेखाली तहसील सर्व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची महसूल आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत महसूल वसुलीचा मंडळनिहाय सविस्तर आढावा घेऊन तालुक्याला देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजनबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीतील प्रमुख सूचना:
महसूल वसुली गतीने पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन. अवैध गौण खनिज वाहतुकीवर प्रत्येक मंडळाने दर आठवड्याला किमान एक कारवाई करावी.
शर्तभंग प्रकरणे शोधून प्रस्ताव सादर करावेत.
स्मशानभूमी नसलेल्या किंवा अडचणी असलेल्या गावांची पाहणी करून अहवाल सादर करावा.
फेरफार व विवादग्रस्त नोंदी विहित मुदतीत निकाली काढून ई-हक्क प्रणालीचा प्रभावी वापर करावा.
दप्तर तपासणी व सेतू केंद्रांची नियमित तपासणी करावी.
वन विभागाच्या नोंदी 7/12 उताऱ्यावर अद्ययावत कराव्यात.
एकरकमी रूपांतरित अधिमूल्य वसुलीसाठी याद्या तयार करून कार्यवाही करावी.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव, मोजणी व स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करावी.
शासकीय जमीन डॅशबोर्डवरील प्रलंबित कामे 100% पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महसूल सहाय्यकांच्या संकलननिहाय कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षाची पाहणी करून अभिलेख व्यवस्थापनाबाबत सूचना देण्यात आल्या.
सिकलसेल व दुर्धर आजारग्रस्त लाभार्थ्यांच्या प्रकरणांचाही आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने व वेळबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
- 0
- 0
- 0
- 0





