
व्यसन मुक्त युवक असेल तरच देश सशक्त होईल: डॉ. संदीप गरुड
तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त आयोजित “व्यसन मुक्ती सप्ताह” साजरा करण्यात आला.

यावेळी डॉ. एस. बी.गरुड यांनी आजचे युवक तंबाखु मिश्रित पदार्थाचे तसेच मादक पदार्थांचे सेवन करून आयुष्य उध्वस्त करत आहेत. त्यामुळे आपल्या देशाची युवा शक्ती मानसिक शारिरीक व्याधीने ग्रासले आहेत असे निदर्शनास आणून दिले.
कार्यक्रमात माजी राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ. आर. डी. मोरे यांनी युवकांना नशा मुक्तीची शपथ दिली. प्राचार्य डॉ. हेमंत दलाल यांनी विद्यार्थांनी व्यसनाधिनतेपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ.गौतम एम. मोरे यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख डॉ. राजू यशोद यांनी व्यक्त केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनीता गायकवाड, माजी कार्यक्रम अधिकारी डॉ. पराग तट्टे, प्रा. पंकज सोनवणे आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलेत.
- 0
- 0
- 0
- 0





