नंदुरबार

दि. हस्ती को-ऑप बँकेत २०२६ च्या दिनदर्शिकेचे अनावरण

तळोदा / सप्त नगरी न्युज

तळोदा येथील दि. हस्ती को-ऑप बँक लि., शाखेत सन २०२६ साठी तयार करण्यात आलेल्या आकर्षक दिनदर्शिकेचे अनावरण व वितरण शाखा समितीचे चेअरमन कीर्तीकुमार शाह यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शाखा समिती सदस्य, खातेदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हस्ती को-ऑप बँक ही ग्राहकाभिमुख सेवा, पारदर्शक व्यवहार व विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. आधुनिक बँकिंग सुविधा, डिजिटल व्यवहार, विविध कर्ज योजना व ठेवींच्या आकर्षक योजना बँकेमार्फत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. व्यापारी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ आर्थिक सेवा देण्यावर बँकेचा भर आहे. सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांतून बँक सातत्याने सहभाग घेत आहे. त्यामुळे बँकेवर ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.

यावेळी शाखा समिती सदस्य अरुण मगरे, प्रकाश माळी, रोहित कापडिया तसेच नरेंद्र छाजेड उपस्थित होते. बँकेचे सभासद, खातेदार, हितचिंतक व सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होता. कार्यक्रम प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.

  • 2
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *