तळोदा येथील एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुवार दि. 18 शालेय स्तरीय विज्ञान व रोबोटिक्स स्टेम सायन्स फेअर प्रदर्शन आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सीनियर कॉलेजचे डॉ. श्रीवास्तव व डॉ.महेंद्र माळी हे उपस्थित होते. शाळेतील दोन ॲल्युमिनि माजी विद्यार्थिनी जिनल जैन व परिता ठक्कर हे परीक्षक म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक सत्यजित नाईक यांनी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
फित कापून शेखर धनगर शालेय स्तरीय विज्ञान व स्टेम सायन्स फेअर प्रदर्शन शालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
उद्घाटनीय भाषणात शिक्षणाधिकारी धनगर यांनी विज्ञान , तंत्रज्ञान व मानव व मानवी जीवन यांच्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रदर्शनी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शिक्षक पालक संघटनेतील पालकांना व सर्वसामान्य पालकांसाठी ही प्रदर्शनी खुली करण्यात आली होती. विज्ञान शिक्षक राजेंद्र पाडवी व मीत देसाई यांचे मार्गदर्शन तसेच स्टेम लॅब चे शिक्षक निखिल पाटील यांचे बहुमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





- 0
- 0
- 0
- 0





