नंदुरबार

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या 26 कामांना मंजुरी; नवापूर विधानसभा क्षेत्रीय समितीची बैठक संपन्न

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या 26 कामांना मंजुरी; नवापूर विधानसभा क्षेत्रीय समितीची बैठक संपन्न

← Back

Thank you for your response. ✨

नवापुर येथे तहसील कार्यालयात मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना क्षेत्रीय समिती अध्यक्ष  आमदार शिरीषकुमार नाईक, अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना नवापूर विधानसभा क्षेत्रीय समितीची बैठक संपन्न झाली.

बैठकीत नवापूर तालुक्यातील तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त 26 कामांना मंजुरी देण्यात आली असून संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश जारी करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष आमदार शिरीषकुमार नाईक यांनी संबंधित विभागांना शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व कामे उच्च दर्जाची, गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीस कापसे , उपविभागीय अधिकारी, नंदुरबार, शेतकरी प्रतिनिधी, सर्व तालुकास्तरीय अधिकारी तसेच क्षेत्रीय समितीचे सदस्य उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी सुकर वाहतूक, शेतीमालाची जलद ने-आण आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या बळकटीसाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, मंजूर कामांच्या माध्यमातून नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *