नंदुरबार पर्यटन

तोरणमाळ होम स्टे प्रकल्पाला गती; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची प्रत्यक्ष पाहणी

तोरणमाळ होम स्टे प्रकल्पाला गती; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची प्रत्यक्ष पाहणी

तोरणमाळ | दि. 18 जुलै

नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या तोरणमाळ येथील होम स्टे प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी होम स्टेची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध मूलभूत सुविधा व कामांच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली.

होम स्टेला येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठ्याची कामे लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.

← Back

Thank you for your response. ✨

ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

इतर आवश्यक दुरुस्तीची कामेही त्वरित हाती घेऊन दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

पर्यटकांना अधिक आकर्षक व आरामदायी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी होम स्टेच्या इंटेरिअर डिझाइनबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन देत स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा होम स्टे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून, सर्व कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

तोरणमाळच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, पर्यटकांसाठी दर्जेदार व सर्व सुविधांनी सुसज्ज होम स्टे उभारण्याच्या दृष्टीने विविध विभागांमार्फत समन्वयाने कामे सुरू आहेत.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *