नंदुरबार

मलेशियात वर्ल्ड स्कूल समिती या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेतसाठी निवड

तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासीबहुल तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात एक अभिमानास्पद अशी बाब ठरली असून तळोदा येथील प्राचार्य भाईसाहेब गो.हु .महाजन व शी.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमरदीप महाजन यांची मलेशिया येथे होणाऱ्या वर्ल्ड स्कूल समिती या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदे साठी निवड झाली.

                     या जागतिक परिषदेत सहभागी झाले. जगभरातील शाळांचे प्रमुख शिक्षण तज्ञ धोरण ठरवणारे तसेच शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक पद्धतीने विद्यार्थ्यांना संस्कार घडवणारी वर्ल्ड स्कूल समिती ही जागतिक स्तरावरील अत्यंत नामांकित परिषद आहे. या परिषदेमध्ये आधुनिक अध्यापन पद्धती नेतृत्व विकास शैक्षणिक नवकल्पना तसेच आगामी आव्हानांवर चर्चा करण्यासाठी दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना या माध्यमातून एक नवीन व्यासपीठ येणाऱ्या काळात उपलब्ध होणार आहे. या निवडीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई अरुण कुमार महाजन संस्थेचे आधारस्तंभ कॉलेज ट्रस्ट चे संचालक अरुण कुमार महाजन तसेच अध्यापक शिक्षण मंडळ सर्व संचालक मंडळ तसेच तळोदा शाखेचे सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *