नंदुरबार नाशिक

शिक्षक समस्याबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत बैठक

नाशिक|सप्त नगरी न्युज ब्युरो

शिक्षक समस्यां संदर्भात शिक्षक आमदार किशोर दराडे यांया उपस्थित नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत चर्चा झाली.

          दिनांक 21 जानेवारी बुधवार रोजी नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालय धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या चारही जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , कनिष्ठ प्राध्यापक यांच्या समस्यांविषयी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत एक बैठक संपन्न झाली.

                या बैठकीला नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे शिक्षण उपसंचालक  राठोड, सहाय्यक देवरे , नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक तसेच शिक्षक नेते एस डी भिरूड , संभाजी आप्पा पाटील , संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली यामध्ये शालार्थ ड्रॉप ,  वैद्यकीय बिले , अनुकंप मान्यता , वैयक्तिक मान्यता , मुख्याध्यापक मान्यता , उपमुख्याध्यापक मान्यता पर्यवेक्षक मान्यता ,कनिष्ठ महाविद्यालयीन थकीत वेतनबाबत, स्वयंअर्थशाळा  प्रस्ताव ,वाढीव तुकडी ,अतिरिक्त समायोजन, इयत्ता दहावी व बारावीच्या केंद्राच्या फेरमान्यता बाबतची चर्चा त्याचबरोबर विविध शैक्षणिक समस्यांविषयी सविस्तर  सकारात्मक चर्चा झाली.
       याप्रसंगी  शिक्षकेतर संघटना नाशिक विभागीय कार्यवाह डी पी महाले प्रा. सुनील गरुड , प्रा. शैलेश राणे , ,संदीप डोलारे,  डिगंबर पाटील ,, एस के पाटील , गोपाळ महाजन ,  राजू महाजन , अमित मराठे , जयेश वाणी  सय्यद इसरार  उदय महाजन. विलास सोनार इत्यादी उपस्थित होते आमदार किशोर दराडे  यांनी प्रलंबित समस्या शिक्षण उपसंचालक राठोड यांच्यासमोर मांडून दोन महिन्याच्या कालावधीत हे सारे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच दिनांक 4 फेब्रुवारी रोजी धुळे  येथे 10 वाजता  दुपारी  3 वाजता नंदुरबार  दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी जळगाव जिल्ह्यासाठी  तक्रार निवारण सभा आयोजित केली आहे

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *