
तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो
तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या भूगोल विभागात द्वारे ” भूगोल” दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ओझोन दिवसानिमित्त भूगोल विभागाद्वारे “भूगोल सामान्य ज्ञान परीक्षा व ओझोन संरक्षण विषयक पोस्टर स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने भूगोल दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण करण्यात आले.

भूगोल सामान्य-ज्ञान परीक्षेसाठी एकूण 350 व पोस्टर स्पर्धेसाठी 27 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी बक्षीस पात्र 30 विद्यार्थ्यांना आज स्पर्धा उपयुक्त पुस्तके व शालेय ॲटलास अशा पद्धतीचे एकूण 5500 रुपये किमतीच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त प्राध्यापक मा. भगवान चिने (कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय रावेर) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भूगोल सामान्य माणसाशी किती व कशा प्रकारचा निगडित आहे. तसेच मानसिक, राजकीय यासंबंधी सुद्धा भूगोलाचा परिणाम सर्वत्र जाणवतो, परिस्थितीनुसार मानवाने कसे वागावे हे सुद्धा भूगोल सांगतो असे प्रतिपादन केले. भूगोल विभाग प्रमुख डॉ. संदीप गरुड यांनी प्रास्ताविकातून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. जे.एन.शिंदे यांनी भूगोलाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजू यशोद यांनी केले. डॉ.पराग तट्टे यांनी बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन केले. डॉ. मोहन वसावे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाला डॉ. एस.एन. शर्मा, डॉ.एस. आर. गोसावी, डॉ. गौतम मोरे,डॉ. एम. एस. जावरे, प्रा.ललित पाटील इत्यादींनी उपस्थिती लावली. श्री अश्विन मगरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
- 0
- 0
- 0
- 0





