नंदुरबार

रांझणी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची आंब्यांची बाग क्षेत्र भेट संपन्न.

रांझणी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची आंब्यांची बाग क्षेत्र भेट संपन्न

तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो

श्री साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपुर संचलित विद्यावर्धिनी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेची क्षेत्रभेट रांझनी जवळील आंब्याच्या शेतात संपन्न झाली.
शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना परिसरातील भौगोलिक परिस्थिती चा अभ्यास होण्यासाठी क्षेत्रभेट ही आवश्यक असून शाळेतील विद्यार्थ्यांना परिसरातील वनस्पती व वन्यजीव यांची माहिती या क्षेत्रभेट मध्ये देण्यात आली. विध्यार्थ्यांना या वेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब कुवर यांनी व प्राथमिक शिक्षक महेश रामोळे यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल विद्यार्थ्यांना वनभोजन सोबत मिष्टान्न देण्यात आले…या वेळी समितीचे प्रमुख रामकृष्ण शिंदे यांनी क्षेत्रभेटीचे महत्व विषद केले.
                     कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी माध्यमिक मुख्यध्यापक शालिग्राम वाणी, मनोज चिंचोले,राजेश पाडवी, भूषण येवले,धनंजय मराठे, गणपत वळवी, महेश सैंदाने, दीपक मालपुरे, अजय कुंभार, जयेश मालपुरे, पूजा वसावे ,मित्रविंदा पाठक, अधीक्षक प्रेम माळी, यश चव्हाण, पुरुषोत्तम मोरे, नानाभाऊ मोरे, राकेश चव्हाण,धीरज कुंभार तसेच सर्व वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले

  • 0
  • 1
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *