नंदुरबार

नीती आयोगाच्या ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न

नीती आयोगाच्या ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक २७ मार्च २०२६ रोजी नीती आयोगाच्या ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. ADHO डॉ. निपटे सर, RMO डॉ. सुलोचना बागुल मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विनय सोनवणे यांनी ब्रेन हेल्थ या विषयाचे वाढते महत्त्व अधोरेखित करत, प्राथमिक स्तरावर मानसिक व मेंदूविषयक आरोग्य सेवा बळकट करण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी मा. जिल्हाधिकारी यांनी ब्रेन हेल्थ संदर्भात जनजागृतीचे महत्त्व विषद करत, प्रत्येक व्यक्तीस या सेवांची आवश्यकता कशी आहे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत सुरू असलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त करून पुढील काळातही ही उपक्रमशीलता कायम ठेवण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी जिल्हा ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक ओजस भावसर यांनी कार्यक्रमाची मूलभूत माहिती, आतापर्यंत झालेली प्रगती व भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच CMF मानसी एंडोले व CMF अभिनव कोल्हे यांनीही या उपक्रमाविषयी माहिती देत त्याच्या अंमलबजावणीतील महत्त्वाच्या बाबी मांडल्या.
प्रशिक्षण सत्रामध्ये ब्रेन हेल्थ क्लिनिक चे तज्ञ फिजिओ थेरपिस्ट डॉ. कल्याणी माळी, मानसोपचार समुपदेशक पूजा शर्मा उपस्थित होते.

नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दिनेश वळवी, स्पीच थेरपिस्ट डॉ. कल्पेश चौधरी तसेच मुंबई येथील किंग जॉर्ज मेमोरियल रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. ईश्वरी गुलहाणे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ब्रेन हेल्थशी संबंधित विविध पैलूंवर सखोल प्रशिक्षण दिले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विनय सोनवणे व उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी यांचे मार्गदर्शन त्याचप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे FMC श्री मनोज चौधरी आणि श्री निलेश शर्मा यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रशिक्षणामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ब्रेन हेल्थ विषयक समज वाढून, रुग्णांना अधिक प्रभावी व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यास मदत होणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
.
.
.

NandurbarDistrict #BrainHealth #MentalHealthAwareness #HealthyMindHealthyLife #BrainCare

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *