नंदुरबार

ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन

ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन

नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो

महाशिवरात्री महोत्सव 2026 अंतर्गत नंदुरबार येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अर्थात ओम शांती परिवारातर्फे परमात्मा शिवांच्या दिव्य अवतरण दिनानिमित्त (90 वी शिवजयंती) प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या वतीने सर्वांसाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य आकर्षण: अद्भुत होलोग्राफिक शिवलिंगाचे दर्शन
जीवन परिवर्तन घडवणारे आध्यात्मिक चित्रप्रदर्शन रविवार 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत खुले राहील. गुरुनानक मंगल कार्यालय, सिंधी कॉलनी, नंदुरबार या ठिकाणी महा शिवरात्रीच्या पावन प्रसंगी परमात्मज्ञानाच्या प्रकाशाने आपले जीवन आनंदी, शांततामय व सुखमय बनवू या. दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रजापिता ब्रह्माकुमारीज नंदुरबार शाखेतर्फे करण्यात आले आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *