नंदुरबार

गुरुची साथ, आमदाराची दाद!मुंबईतील शरीरसौष्ठव स्पर्धेत मनोज चित्रकथे प्रथम; आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते सत्कार

गुरुची साथ, आमदाराची दाद!
मुंबईतील शरीरसौष्ठव स्पर्धेत मनोज चित्रकथे प्रथम; आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते सत्कार

तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो :- तालुक्यातील बोरद येथील मनोज चित्रकथे याने मुंबई येथे आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत परिसराचा नावलौकिक वाढविला आहे. हॉटेल व्यवसायाची जबाबदारी सांभाळत नियमित व्यायाम आणि सरावाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.


मनोजचे प्रशिक्षक उज्ज्वल पाटील यांनी समाजमाध्यमांवर त्याच्या यशाची दखल घेऊन सत्कार करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार बोरद येथील भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. सोमावल येथील कलावती फार्म हाऊस येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते मनोजचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार पाडवी यांनी मनोजच्या मेहनतीचे कौतुक करून प्रशिक्षक उज्ज्वल पाटील यांनी असेच गुणवंत खेळाडू घडवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. मनोजचे यश परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *